मुंबई : मुंबईच्या चौपाट्यांवरची भेळपुरी, पाणीपुरी किंवा काहीही खातांना तुम्ही नेहमी विचार करतो. पण आता आजीबात काळजी करण्याचे कारण नाही आहे. आजपासून तुम्ही बिनधास्त खाऊ शकता, कारण मुंबईच्या गिरगांव आणि जुहू चौपाटीला आता ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा मिळाला आहे.

मुंबईतील गिरगांव चौपाटी आणि जुहू चौपाटीची निवड अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाकडून या योजनेसाठी करण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासन आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संयुक्त तपासणी, आणि त्रुटींच्या पूर्ततेनंतर ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा गिरगांव, जुहू चौपाटीला देण्यात आला.

देशात पहिला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा गुजरातमधील अहमदाबादच्या कांकरिया लेक ला देण्यात आला आहे.

VIDEO | गिरगाव, जुहू चौपाटीला 'क्लीन स्ट्रीट फूड हब'चा दर्जा | मुंबई | एबीपी माझा



क्लिन स्ट्रीट फूड हबचा दर्जा म्हणजे काय?

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांची विक्री केली जाते त्याठिकाणी ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ ही योजना राबवली जाते. अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, निर्भेळ अन्नपदार्थ, तसंच अन्नपदार्थ विक्रीच्या परिसराची तपासणी करुन, त्रुटींची पूर्तता करुन ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा दिला जातो.