एक्स्प्लोर

मुंबई होणार खड्डेमुक्त, जिओ पॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे 

Mumbai news : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरून काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे होणारे खड्डे भरून काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी  15 महिन्यांच्या कालावधीसाठी खड्डे भरण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रकाशित केल्या आहेत.  

मुंबई महानगरात मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. हे खड्डे तत्काळ बुजवण्यात आले तरी सततचा जोरदार पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे कोल्डमिक्स सारख्या पारंपरिक तंत्रज्ञानाच्या वापरावरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे  खड्डे भरल्यानंतरही काही कालावधीत पुन्हा नवे खड्डे पडतात. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी खड्डे बुजवण्यासाठी नवीन आणि प्रगत स्वरुपाच्या अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश रस्ते विभागाला दिले.

पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार उपायुक्त उल्हास महाले यांच्या देखरेखीखाली रस्ते विभागाने  दयाशंकर चौक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा रस्ता तसेच आणिक-वडाळा मार्गावर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर केली होती. यामध्ये रॅपिड हार्डिंग काँक्रिट, एम 60 काँक्रिट भरून त्यावर स्टील प्लेट अंथरणे, जिओ पॉलिमर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक या चार पद्धतींचे प्रायोगिक तत्त्वावर सादरीकरण करण्यात आले होते.  
 
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या रस्ते विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची तसेच नवीन तंत्रज्ञानाची चाचपणी केल्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्यावेळी रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरून  वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कायमस्वरूपी चांगला पर्याय अमलात आणावा, असे निर्देश   मुख्यमंत्र्यांनी दिले. 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रॅपिड हार्डनिंग काँक्रीट आणि जिओ पॉलिमर या दोन नवीन आणि अभिनव पद्धतींचा उपयोग करून रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे हे तिन्ही विभाग मिळून पाच कोटी रुपये खर्चाच्या पाच निविदा प्रकाशित करण्यात आल्या आहेत. पुढील पंधरा महिन्यांच्या कालावधीसाठी या निविदाद्वारे कंत्राटदार नियुक्त केले जातील. 

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget