Gay Dating App: गे डेटिंग ॲप'वर मैत्री करणे मुंबईतील एका तरूणाला भलतंच महागात पडलंय. या ॲपवर ओळख झालेल्या मित्रानींच जबरदस्तीनं सबंधित तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तरूणाचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडे पन्नास हजारांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ही संपूर्ण घटना मुंबईच्या (Mumbai) मालवणी (Malwani) परिसरात घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणाची 17 जानेवारीला 'गे ॲप'वर आरोपींशी ओळख झाली. दरम्यान, काही दिवस ऑनलाइन चॅटिंग केल्यानंतर आरोपीने त्याला भेटण्यासाठी बोलावले. जेव्हा फिर्यादी 5 आरोपींना भेटायला गेला असता त्यांनी तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, फिर्यादी तरूणानं त्यांना विरोध केला. त्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करून त्याचा फोन, डेबिट कार्ड आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच या तरुणाला विविस्त्र करून त्याचा व्हिडिओ बनवला. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडं पन्नास हजारांची मागणी केली. 


याप्रकरणी तरूणाने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तसेच अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. इरफान फुरकान खान, अहमद पारूख शेख, इमरान सकीफ शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मालवणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. 


पोलिसांनी सांगितले की, गे डेटिंग ॲप डाऊनलोड केल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. तसेच तो कोणत्या ठिकाणी राहतो, हे देखील सांगावं लागतं. त्यानंतर त्या भागातील सर्व समलिंगी मुलं एकमेकांशी जुळून येतात. त्या डेटिंग ॲपच्या माध्यमातून लोक आधी एकमेकांशी चॅट करतात. त्यानंतर एकमेकांना भेटतात आणि शारीरिक संबंध ठेवतात, अशी माहिती मिळत आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha