Dombivali News : अनेकदा बांधकाम सुरु असलेल्या इमारतींच्या कन्स्ट्रक्शन साईटवर अपघात झाल्याच्या बातम्या कानावर पडतात. बांधकाम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळून किंवा खाली पडून अनेक मजुरांचा मृत्यू होता. अशीच एक घटना डोंबिवलीतील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या कन्स्ट्रक्शन साईटवर घडली आहे. या अपघातात एका 10 वर्षीय चिमुकल्यानं आपला जीव गमावला आहे. 

Continues below advertisement

डोंबिवलीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळं संर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंबिवली पूर्वेकडील सागाव परिसरात बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीच्या परिसरात ही घटना घडली. सत्यम मौर्य असं या मुलांचं नाव असून तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा 10 वर्षांचा मुलगा सत्यम खेळण्यासाठी बाहेर गेला. जवळपास दोन तास सत्यम घरी न आल्यानं कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. तासभर शोध घेतल्यानंतरही सत्यम सापडला नाही.

Continues below advertisement

त्यानंतर कुटुंबियांनी जवळच बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये जाऊन त्याचा शोध घेण्याचं ठरवलं. इमारतीच्या आवारात सत्यमचा शोध घेत असतानाच इमारतीच्या लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सदर प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. आणि सत्यमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळं आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्धच ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा