एक्स्प्लोर

बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी, मुंबईतल्या चौपाट्यांवर ड्रोनची नजर

मुंबई : गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या गणरायाला उद्या निरोप देण्यात येणार आहे. गणपती विसर्जन सुरळीत पार पडावं, यासाठी विविध सरकारी यंत्रणांनी चांगलीच कंबर कसली आहे. मुंबईत विसर्जनस्थळी सीसीटीव्ही, ड्रोनची नजर विसर्जन ठिकाणी पालिका कर्मचारी, अग्निशमन पथक, वैद्यकीय पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत. मुंबईत 69 नैसर्गिक, तर 31 कृत्रिम विसर्जन स्थळ सज्ज करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आणि ड्रोनची नजर असेल. जलप्रदूषण टाळण्यासाठी जास्तीत जास्त गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जन करावं असं आवाहन महापालिकेने केलं आहे. तसंच विसर्जनाच्या मार्गावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा मरीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी हायटेक तराफा वापरण्यात येणार आहे. गणपती विसर्जनला वाहतुकीमध्ये बदल - 55 रस्ते वन वे - 49 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद - 18 रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक बंद - 99 रस्त्यांवर पार्किंगला मनाई विसर्जनाला शहरातील हे मार्ग बंद - जे. एस. एस. रोड, चिरा बाजार - जगन्नाथ शंकरशेठ रोड, गिरगाव -  एस.व्ही.पी. रोड, गिरगाव - सी. पी. टँक रोड, काळबादेवी - डॉ. बी.ए. आंबेडकर रोड, परेल -  न.चिं. केळकर रोड, दादर - रानडे रोड, दादर - लिंकिंग रोड - जुहू तारा रोड - आरे कॉलनी रोड - एलबीएस रोड, कुर्ला आणि मुलुंड यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात विसर्जन यंदा पुणेकरांनी गणपती विसर्जनादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतल्याचं दिसत आहे. नैसर्गिक विसर्जन स्थळांशिवाय पालिकेकडून कृत्रिम स्थळही उभारण्यात येत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील मानाच्या गणपतीचं नदीऐवजी हौदातच विसर्जन केलं जाणार आहे. तसंच जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांना अमोनियम बायकार्बोनेटचं वाटप करण्यात येत आहे. नाशिकमध्ये 800 पोलिसांचा फौजफाटा तर बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिकमध्येही जोरदार तयारी सुरु आहे. नाशिकमध्ये दुपारी 3 वाजल्यानंतर मोठ्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जनासाठी 800 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget