एक्स्प्लोर
विधवेवर सामूहिक बलात्कार, पाच आरोपींना अटक
रात्री उशिरा ही महिला घरी पोहोचली. दुसऱ्या दिवशी तिने मानखुर्द पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : मानखुर्दच्या मंडाला विभागात एका 30 वर्षीय विधवा महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत महिलेने केलेल्या तक्रारीनंतर मानखुर्द पोलिसांनी प्रणय इंगळे, अमोल निर्मल, अजय कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
मानखुर्द मंडाला विभागात पतीच्या निधनानंतर तीन मुलांना घेऊन सदर पीडित महिला राहते. 15 तारखेला मध्यरात्री ही महिला साठेनगर परिसरात एका कार्यक्रमाला गेली होती. कार्यक्रमानंतर रात्री 11 च्या सुमारास ती घराकडे जाण्यासाठी निघाली होती. याच दरम्यान तिला यातील तीन आरोपी भेटले. या आरोपींनी तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन जबरदस्तीने तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी तिथून पोबारा केला.
त्यानंतर ही महिला स्वतःला सावरत कशीबशी रस्त्यावर आली. रात्रीच्या वेळी तिला पाहून अन्य दोघे तिची विचारपूस करण्याच्या बहाण्याने तिथे आले आणि त्यांनी देखील तिच्यावर बलात्कार केला.
रात्री उशिरा ही महिला घरी पोहोचली. दुसऱ्या दिवशी तिने मानखुर्द पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी या पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
