मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshostav 2023)कोकणासह कोल्हापूरला जाणाऱ्या भाविकांना दिलासा देणारी बातमी...गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार आहे. एवढंच नाही तर खासगी ट्रॅव्हल्स किती दर आकारावेत याचं दरपत्रकही जारी केलंय. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांच्या होणाऱ्या लुटीला ब्रेक लागणार आहे. 


गणेशोत्सवासाठी  कोकणात  सणाला अनेक जण सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचा नियोजन करतात. ज्यांनी गणपतील ऐनवेळी गावाला जाण्याचे नियोजन केलं आहे त्यांना मात्र प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत आणि ते थोडे थोडके नाही तर जवळपास दुप्पट पैसे जास्त मोजावे लागतात. या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स किती दर आकारावेत याचं दरपत्रकही जारी केले.


मुंबईत स्थायिक असलेल्या प्रत्येक कोकणवासीयांची लगबग सुरु असते. रेल्वे आणि एसटीचे सहा महिने आधी बुकिंग बरेच जण करतात. त्यामुळे एसटी आणि रेल्वेचं आयत्यावेळी बुकिंग मिळणं हे कठीण होऊन होतं. त्यामुळे कोकणवासीयांसाठी कोकणात जाणं सुलभ व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. यामुळे कोकणातील चाकरमानी आता खुश होणार यामध्ये शंका नाही.


गणपतीसाठी खासगी ट्रॅव्हल्सने जाणाऱ्या प्रवाशांसाठी वाशी आरटीओने जाहीर केलेलं दरपत्रक 



  • वाशी ते महाड - 428 रु.

  • वाशी ते खेड – 578 रु.

  • वाशी ते चिपळूण – 623 रु.

  • वाशी ते दापोली – 533 रु.

  • वाशी ते श्रीवर्धन – 428 रु.

  • वाशी ते संगमेश्वर – 728 रु.

  • वाशी ते लांजा – 893 रु.

  • वाशी ते राजापूर – 953 रु.

  • वाशी ते रत्नागिरी – 848 रु.

  • वाशी ते देवगड – 1185 रु.

  • वाशी ते गणपतीपुळे – 975 रु.

  • वाशी ते कणकवली – 1110 रु.

  • वाशी ते कुडाळ – 1185 रु.

  • वाशी ते सावंतवाडी – 1260 रु.

  • वाशी ते मालवण – 1215रु.

  • वाशी ते जयगड – 953रु.

  • वाशी ते विजयदुर्ग – 1200 रु.

  • वाशी ते मलकापूर – 908 रु.

  • वाशी ते पाचल – 990 रु.

  • वाशी ते गगनबावडा –110 रु.

  • वाशी ते साखरपा – 818रु.


हे ही वाचा :


Ajit Pawar : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गणपतीत पुणे मेट्रो रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा