एक्स्प्लोर

Ganeshotsav 2022 : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, यंदाच्या गणेशोत्सवकरिता बीएमसीने जारी केली नवीन मार्गदर्शिका

Ganeshotsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (21 जुलै 2022 ) गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम या सणावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला.

Ganeshotsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (21 जुलै 2022 ) गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम या सणावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोना महामारीनंतर आता राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर मुंबई महानगर पालिकेनं यंदाच्या गणेशोत्सवकरिता सुधारित मार्गदर्शिका जारी केली आहे. 

बीएमसीने मार्गदर्शिकामध्ये नेमकं काय म्हटलेय?

1. गणेश मंडळांच्या मंडपांच्या परवानगीसाठी 100 रुपये शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येत आहे. तसेच जर यापुर्वी गणेशोत्सव 2022 साठीच्या मंडपांच्या परवानगीकरीता मंडळांनी शुल्क भरुन परवानगी प्राप्त केली असेल तर अशा मंडळांना 100 रुपयांचा परतावा लवकरच करण्यात येईल. 

2. गणेशोत्सव 2022 करता मूर्तिकारांच्या मंडपांकरिताचे शुल्क परमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडून पूर्णपणे माफ करण्यात येईल. तसेच ज्यांनी याअगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सरद शुल्काचा परतावा करण्यात येईल. 

3. गणेशोत्व 2022 करिता अनुज्ञापन खात्यामार्फत आकारण्यात येणारे जाहिरात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येईल. तसेच ज्यांनी अगोदर शुल्क भरले असेल तर त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल. 

4. महापालिकेच्या मंडप उफारणीबाबत उद्यान खाते व मालमत्ता खाते व खासगी भूखंडावर आकारण्यात येणारे शुल्कदेखील माफ करण्यात येईल.

5. सार्वजनिक गणेशोत्व मंडळांच्या गणेशमूर्तींसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध 2022 च्या गणेशोत्सवाकरिता असणार नाहीत. 

6. घरगुती गणेश मूर्तीसाठी या अगोदर दोन फुट उंचीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली होती. तरी आता घरगुती गणेश मूर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतु घरगुती मूर्तीच्या उंचीवर स्वखूशीने दोन फूट उंचीची मर्यादा पाळण्याबाबत आवाहन करण्यात येईल. 

7. नैसर्गिक विसर्जन स्थळी तसेच कृत्रिम विसर्जन स्थळी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यात येईल. 

8. आगमन व विसर्जन रस्त्यांवर संबंधित वीज पुरवठादार यांच्यामार्फत विजेच्या व्यवस्तेबाबत संबंधित विभागीय सह आयुक्त यांच्यास्तरावर चर्चा करुन आवश्यक ती सुधारणा (दिवा बत्तीची संख्या व क्षमता) करण्यात येईल. 

9. मंडप शुल्क माफ करम्यात आले असले तरीसुद्धा विविध परिपत्रकांमध्ये असलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. (उदा. अग्निशमन दलाचे कोडीफाईड शर्ती, अनुज्ञापन खात्याचे अटी व शर्ती, इत्यादी.)

महत्त्वाच्या बातम्या

Kohinoor Apartment Building Collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत तत्काळ गुन्हा दाखल करा; दोषींवर कठोर कारवाई...; मुख्यमंत्र्यांचे महापालिका प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश
भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत तत्काळ गुन्हा दाखल करा; दोषींवर कठोर कारवाई...; मुख्यमंत्र्यांचे महापालिका प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश
Mumbai Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Embed widget