मुंबई : चिंचपोकळीच्या चिंतामणीला (Chintamani) यंदाच्या वर्षात 104 वर्ष पूर्ण होत आहेत. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शानासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. याच चिंचपोकळीच्या चिंतामणीचा प्रथम दर्शन सोहळा रविवार (17 सप्टेंबर) रोजी पार पडला. मुंबापुरीसाठी गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा सण असतो. मुंबईतर त्यांच्या लाडक्या बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे या दहा दिवसांमध्ये मुंबईकरांचा उत्साह हा वाखाडण्याजोगा असतो. मुंबईतील गणेश मूर्तींचं दर्शन घेण्यासाठी भक्तींची अलोट गर्दी पाहायला मिळते.
राम मंदिरात बाप्पा विराजमान
चिंचपोकळीचा चिंतामणीला दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर केले जातात. यंदा मंडळाकडून राम मंदिराचा देखावा सादर करण्यात आला आहे. पुढील वर्षी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा रामाच्या मंदिरात विराजमान झाला आहे. तर बाप्पाची मूर्ती देखील रामाच्या अवतारात आहे. बाप्पाच्या शेजारी लक्ष्मण आणि सीता आहेत. तर हनुमान देखील बाप्पाच्या मुर्तीसोबत आहे. दरम्यान यावेळी रहिवाश्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी देखील मंडळाकडून करण्यात आली आहे.
गणेश भक्तांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन झालं होतं. त्यानंतर आता प्रथम दर्शन सोहळा देखील दणक्यात पार पडला. मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाप्पा विराजमान होत आहेत. त्यामुळे प्रत्येकामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतयं.
अशी असणार सुरक्षेची व्यवस्था
दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळाकडून 65 कॅमेरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच मंडळाचे 1200 सहाय्यक सदस्य, 800 स्वयंसेवक आणि 108 पदाधिकारी देखील सातत्याने कार्यकरत असणार आहेत. तसेच रक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षेची प्रत्येक जबाबदारी मंडळाकडून घेण्यात आल्याचं पाहायला मिळणार आहे.
शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजा आणि रविवार 17 सप्टेंबर रोजी मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा पार पडला. शिवराज्याभिषेकाच्या 350 सोहळ्यानिमित्त बऱ्याच मंडळांनी त्याच दृष्टीकोनातून देखावा साकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दर्शन हे मंडळांकडून साकारण्यात आलं आहे. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासोबत शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव देखील भक्तांना घेता येईल.
हेही वाचा :
Girgaoncha Raja : गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा, संभाजीराजे छत्रपतींना लावली हजेरी
Mumbaicha Raja : मुंबईच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार