गणपती बाप्पाचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईत देखील मानाच्या गणराजाच्या दर्शनासाठी दरवर्षी रांगा लागतात. सिद्धीविनायक, लालबागचा राजासह अनेक प्रमुख मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्त लांबून येतात. बाप्पाचं आगमन झालं की मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाकडे भक्तांची पावलं वळतात. हजारोंच्या संख्येनं भाविक सिद्धीविनायकाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. मात्र यंदा कोरोनामुळं भाविकांना बंधनं आलीत.
तरीही सिद्धीविनायकाचं दर्शन 24 तास आपण ऑनलाईन घेऊ शकणार आहोत. तसेच रोज गणेश आरतीचा देखील लाभ भाविक घेऊ शकणार आहेत. यासाठी सिद्धीविनायक ट्रस्टच्या Shree Siddhivinayak या यू ट्यूब लाईव्हवर आपल्याला जावं लागणार आहे.
सिद्धीविनायकाचं दर्शन 24 तास ऑनलाईन पाहा इथं
गजाननाच्या मुर्ती स्थापनेचा शुभ मूहुर्त
पंचांगानुसार, चतुर्थी 21 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी सुरु होणार असून 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच, गणेश चतुर्थीची पूजा दुपारच्या वेळीच करण्यात येते. कारण श्रीगणेशाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. गणरायाच्या पूजेचा वेळ 22 ऑगस्टपर्यंत दुपारी 2 तास 36 मिनिटांपर्यंत आहे. 22 ऑगस्ट रोजी म्हणजेच, आज सकाळी 11 वाजून 06 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना करू शकता. पंचांगानुसार, 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून ते संध्याकाळी 4 वाजून 48 मिनिटांपर्यंतचा मुहूर्तही अत्यंत शुभ आहे.
गणरायाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. बुद्धिचं दैवत असणाऱ्या आणि आपलं सर्व विघ्न दूर करणाऱ्या या विघ्नहर्त्याच्या 108 नावांचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व बाधा दूर होतात, असं सांगण्यात येतं. आज आम्ही तुम्हाला गणेशाची 108 नावं सांगणार आहोत. ज्यांचा मनापासून जप केल्याने गणपतीचा आशिर्वात प्राप्त होतो, असं सांगितलं जातं.
गणरायाच्या नावांचा जप करण्याचा विधी
गजाननाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता. पंचांगानुसार, 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. चुतुर्थी तिथीचा आरंभ 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. तर चतुर्थी तिथीची समाप्ती 22 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजून 56 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी गणेश पुजेचा वेळ 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 42 मिनिटांपर्यंत आहे. पूजेच्या वेळी गणरायाच्या या नावांचा जप करण्याला अत्यंत महत्त्व आहे.