एक्स्प्लोर

'लाचखोर गजानन पाटील तीन महिन्यांपासून ACB च्या रडारवर'

मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कथित पीए गजानन पाटील 30 कोटीच्या लाचखोरी प्रकरणात गजाआड झाल्यानंतर, मोठी रंजक माहिती बाहेर येऊ लागली आहे.   "लाचलुचपत प्रतिबंध विभाग गेले 3 महिने गजानन पाटीलच्या मागावर होती. त्याचे रेकॉर्ड्स सरकारकडे उपलब्ध आहेत. या तपासात कुठलीही ढवळाढवळ होणार नाही" असं मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं.   एकनाथ खडसेंनी तक्रारदार रमेश जाधव यांना विकृत म्हणत गजानन पाटलाची पाठराखण केली होती. त्यामुळं एसीबीच्या कारवाईवर खडसे संशय कसा घेतात? असा सवाल विचारला जाऊ लागला.   काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण? राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.   ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.   एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण दरम्यान, “गजानन पाटील नावाची व्यक्ती माझ्या मुंबई किंवा जळगावातील कार्यालयात अधिकृत किंवा खासगीरित्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही,” असं स्पष्टीकरण एकनाथ खडसेंनी दिलं आहे. तसंच माझ्या नावाचा गैरवापर करत असून दोषींविरोधात कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.   याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, “गजानन पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी आहेत. ते अधूनमधून जळगाव जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत आणतात. तसंच तालुक्यातील रहिवासी असल्याने त्यांच्याशी ओळख आहे.”

संबंधित बातम्या

30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक

जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
Jayant Patil:  नदी समुद्राला मिळाली की अस्तित्व संपतं, तुम्ही ज्या समृद्रात जाताय, त्यातून...; जयंत पाटलांनी भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget