मुंबई: घरासमोर, गल्लीत, किंवा कुठेही फुकटात लागणाऱ्या रांगांसाठी येत्या मार्च महिन्यापासून पैसे मोजावे लागणार आहेत.


कारण मुंबई महापालिकेच्या पेड पार्किंगच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे कंपाऊंडच्या बाहेर लागणाऱ्या गाड्यांसाठी महिन्याकाठी हजारो रुपये मोजावे लागतील.

चार चाकी वाहनांसाठी 

  • महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिमहिना 5 हजार 940 रुपये

  • कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 3 हजार 960 रुपये

  • तर सर्वात कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 1 हजार 980 रुपये भरावे लागतील


दुचाकी वाहनांसाठी

  • महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिमहिना 2 हजार475 रुपये

  • कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 1 हजार 650 रुपये

  • तर सर्वात कमी महत्त्वाच्या जागी प्रतिमहिना 825 रुपये भरावे लागतील


 

राज्य सरकारनं हा निर्णय नेमका पालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतला आहे. त्यामुळे त्यामागे पालिकेच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय.

मुंबईच्या मर्यादित क्षेत्रफळात रोजच्या रोज 172 गाड्यांची भर पडते. मुंबईच्या प्रतिकिलोमीटरवर 430 गाड्या धावतात.

दुसरीकडे पार्किंगची व्यवस्था इमारतींमध्ये होतेच असं नाही. त्यामुळे रस्त्ये अडवून पार्किंग करणाऱ्यांवर नियंत्रण हवं असेल. तर ही योजना आणणं ही काळाची गरज आहे. पण त्यातही राजकारण होऊ नये. इतकंच.