मुंबई: राजीनामा खिशात घेऊन फिरत असल्याचं सांगणारे शिवसेनेचे मंत्री शिवजयंतीच्या मुहूर्तावर सरकारमधून पाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


18 तारखेला शिवसेनेचे मंत्री आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करतील. आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 फेब्रुवारीला हे सर्व राजीनामे राज्यपालांकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

18 फेब्रुवारी रोजी वांद्र्यातल्या बीकेसीमध्ये शिवसेनेच्या प्रचाराची शेवटची सभा होणार आहे. त्याच सभेमध्ये हे पाऊल उचललं जाऊ शकतं.

दरम्यान निकालाआधीच राजीनामे देण्यापेक्षा निकाल येईपर्यंत वाट पाहून त्यानंतर सरकारमधून बाहेर पडण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असं काही शिवसेना नेत्यांचं मत आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला शिवसेनेच्या तुल्यबळ यश मिळाले. तर विरोधाची धार वाढवू, असं काही सेना आमदारांचं मत आहे.

दरम्यान, अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसून, कल्याण-डोंबिवलीप्रमाणे पुन्हा एकत्र येता येईल असा आशावाद भाजपला आहे. त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही, असं मत भाजपचं आहे.

राजीनामे खिशात

दरम्यान, शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे खिशात असल्याचा दावा परिवहन मंत्री दीवाकर रावते यांनी केला होता. शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानंतर रावतेंनी त्यांचं राजीनामा पत्रही दाखवलं होतं.

शिवसेना मंत्र्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ‘वर्षा’ बंगल्याबाहेर आल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी राजीनाम्याचं पत्रच दाखवलं.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या

मुंबई तोडण्यासाठीच भाजपचा मुंबई पालिकेवर डोळा: उद्धव ठाकरे 

शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?

सत्तेसाठी भाजपची कुणाशीही हातमिळवणी : उद्धव ठाकरे