नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पुन्हा एकदा सर्वपक्षीय नेते एकत्रित झाले असून, त्यांनी आज विविध मागण्यासाठी सीबीडीमध्ये आंदोलन केलं.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या होवू घेतलेल्या भवनाला मार्बल बसविण्याचा प्रस्ताव पास केला असताना,  आयुक्त मुंढे यांनी विरोध केल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे.

याशिवाय मनपा शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविण्यात झालेला विलंब. तसेच शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई आणि झोपडपट्ट्यांवर होणारी कारवाईसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एल्गार पुकारला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व महापौर सुधाकर सोनवणे करत असून, यामध्ये शिवसेना नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरत भगत सभागी झाले आहेत.  पण दुसरीकडे भाजपने या आंदोलनापासून चार हात लांबच राहणे पसंत केलं आहे.