Mumbai News Update : कोरोना महामारीपासून (Corona) सामान्यांसाठी आरोग्य सेवा ही अत्यंत महत्त्वाची झाली आहे. वेळेवर आणि योग्य उपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचं असल्यानं आता राज्य सरकारनं (State Govt.) मुंबईकरांसाठी (Mumbai) एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील नागरिकांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackerey Trauma Care Municipal Hospital) आणि पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून 2 ऑक्टोबरपासून मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. मुंबईत 227 आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 50आरोग्य केंद्रांचा शुभारंभ होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रांद्वारे सुमारे 139 वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत.
आरोग्य केंद्र उभारणी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Eknath Shinde) नुकताच सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी, 'झोपडपट्टीभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोबाईल मेडिकल युनिटची संख्या वाढवावी तसेच मॅमोग्राफीसाठी देखील मोबाईल व्हॅन सुरू कराव्यात,' असे निर्देश दिले. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे क्लिनिक आणि पॉलिक्लिनिक चालविण्यात येणार आहेत. सध्या 50 ठिकाणी या क्लिनिकचे काम पूर्ण झाले असून शहरातील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मिळून एकूण 227 क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये 34 पॉलिक्लिनिक असणार आहेत.
मुंबईच्या वाढीव लोकसंख्येसाठी आरोग्यसेवा
मुंबईतील वाढती लोकसंख्या दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. मुंबईतील 25 ते 30 हजार लोकसंख्येकरीता एक याप्रमाणे ही क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. सकाळी 7 ते 2 आणि दुपारी 3 ते रात्री 10 अशाप्रकारे रुग्णांच्या सोयीनुसार दोन सत्रात या दवाखान्यांची वेळ असणार आहे. या दवाखान्यात एक एम बी बी एस डॉक्टर, परिचारिका, औषधनिर्माता, आणि बहुउद्देशीय कामगार असे मनुष्यबळ असेल.पॉलीक्लिनिक महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात अडीच ते तीन लाख लोकसंख्येसाठी असेल. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी करण्यात आहे. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादरीकरण केले.
हे देखील वाचा-