कल्याण : अतिशय छोट्या कारणावरुन वाद झाला असता चौघा जणांनी मिळून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना कल्याण पश्चिम येथे घडली आहे. दरम्यान या घटनेवेळी सोन्याची चेन आणि काही रोकड सुद्धा गहाळ झाल्याची माहिती समोर येत असून याप्रकरणी चौघांपैकी दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर दोघांचा तपास पोलीस करत आहेत.


मुंबई येथील दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई विश्राम महाजन शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास गावदेवी रोडवरून कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बँकेच्या एटीएममध्ये घराचा हप्ता भरण्यासाठी दुचाकीवरून जात होते. नेतीवली सर्कल जवळ आले असता त्यांना एक फोन आला. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला लावली आणि ते फोनवर बोलत होते. इतक्यात तेथे दुचाकीवर आणि रिक्षातून आलेल्या चौघांनी महाजन यांना गाडी पुढे घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि चौघांनी मिळून त्यांना मारहाण केली. झटापटीदरम्यान महाजन यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि खिशातील 5 हजाराची रोकड गहाळ झाली. या घटनेनंतर पोलीस शिपाई विश्राम महाजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोर चौकडीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणातील चौघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. चंदन गौड आणि संदीप तुपेरे अशी अटक केलेल्य़ांची नावे असून अन्य दोघे हल्लेखोर फरार आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहेत.


महत्वाच्या बातम्या 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live