Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीची (Corona) भिती वाढू लागली असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 922 असल्याने प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत 500 हून अधिकच्या संख्येने वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत नवीन 922 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ही 0.06 वर गेला असून रुग्णदुपटीचा दरही 1 हजार 139 दिवसांवर गेला आहे.






रविवारी आढळलेली रुग्णसंख्या








 

२६ डिसेंबर, संध्या. 6.00 वाजता 24 तासांत बाधित रुग्ण- 922

 

24 तासात बरे झालेले रुग्ण-326

 

एकूण बरे झालेले एकूण रुग्ण-7 लाख 47 हजार 864

 

बरे झालेल्या रुग्णांचा दर-97%

 

एकूण सक्रिय रुग्ण-4 हजार 295

 

दुप्पटीचा दर-1 हजार 139 दिवस

 

कोविड वाढीचा दर (19 डिसेंबर-25 डिसेंबर)-0.06%




संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha