Ahmednagar: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागलीय. दरम्यान, राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवाहर नवोदय शाळेत 33 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. दोन दिवसांपूर्वी याच शाळेतील 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आठवड्याभरात 52 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं परिसरात एकच खळबळ माजलीय. 


अहमदनगर जिल्ह्यातील दंडाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले की, "अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील जवाहर नवोदय शाळेतील 33 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय". या शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्याचं सल्ला देण्यात आलाय. तसेच 450 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे, शाळा पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा प्रशासनानं निर्णय घेतलाय.  ज्या विद्यार्थ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यांना शाळेच्या वसतिगृहातच क्वारंटाईन करण्यात आलंय.


एएनआयचं ट्वीट- 



केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित जवाहर नवोदय विद्यालय ही अनुदानीत शिक्षण संस्था कार्यरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 अंतर्गत या शाळेची स्थापना झाली.  या शाळेत इयत्ता सहावीपासून ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं.  या शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी पाचवी आणि आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देता येते.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-