एक्स्प्लोर

शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या. मात्र सत्तास्थापनेसाठी चाललेल्या हालचालीत शिवसेनेला यश मिळत आहे. आणखी एका अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 160 मधील उमेदवार किरण लांडगे शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत. लांडगे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अपक्षांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील जागांची दरीही वाढत आहे.

राज ठाकरेंच्या 'सात'ची 'साथ' शिवसेनेला की भाजपला?

मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) मधील प्रभाग क्रमांक 62 मधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. चंगेज यांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वात चंगेज यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ चंगेज मुलतानी दुसरीकडे सुधीर मोरेंसह स्नेहल मोरेंनीही सेनेत प्रवेश केला आहे. घाटकोपरमध्ये शिवसेना उमेदवारांच्या विरोधात माजी शिवसेना विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी केली होती. बंडखोरी केल्यानं त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. अपक्ष उभ्या राहिलेल्या त्यांच्या वहिनी स्नेहल मोरे या एक हजार मतांनी निवडून आल्या.

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

गोरेगावच्या दिंडोशीतील (प्रभाग क्रमांक 41) अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. आतापर्यंत चार नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेनेचं संख्याबळ 88 झालं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दूत पाठवले, आमिषं दाखवली, पण मी शिवसैनिक : सुधीर मोरे

मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. भाजपला 82, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत शिवसेनेला 84 (आता 88), भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत. या गणितात काँग्रेसला साहजिकच महत्त्व आहे.

मुंबईत शिवसेनेची आणखी एक जागा वाढणार!

काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने पावलं टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मुंबईचा महापौर आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पाठिंब्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असाही गर्भित इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

‘समाजवादी पक्षा’चा शिवसेनेला पाठिंबा?

समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत या पक्षाने शिवसेनेला या अगोदर मदत केली आहे. यामुळेच सपाची मदत होऊ शकते, असं शिवसेनेचं गणित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Ramdas Kadam: माझ्या पत्रकारपरिषदेपूर्वीच ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
माझ्या पत्रकारपरिषदेपूर्वीच ऑडिओ क्लीपविषयीची 'ती' गोष्ट रामदास कदमांना कशी समजली? मनोज जरांगेंचा सवाल
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट, मुंबई पोलिसांनी सुरतमधून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली, आणखी तीन जण अटकेत
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करण्याची मागणी, ज्योती वाघमारे म्हणाल्या, हा कसला बालिशपणा, सपकाळांचे डोके ठिकाणावर आहे का?
एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना अटक करण्याची मागणी, ज्योती वाघमारे म्हणाल्या, हा कसला बालिशपणा, सपकाळांचे डोके ठिकाणावर आहे का?
Manoj Jarange Audio Clip Marathi News: 500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip : मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
मनोज जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'जरांगेंच्या विरोधात…'
Sanjay Raut on Amit Shah: तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
तुम्ही अमरपट्टा घेऊन आलाय का, मिस्टर लॉरेन शाह, अमित बिश्नोई? चेहऱ्यावर भीती, लटपटणारे पाय सुद्धा आम्हाला दिसतायत; संजय राऊतांचा प्रहार
Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
मनोज जरांगे डुप्लिकेट मराठा, सुपारी घेऊन शिंदेंच्या विरोधात बोलतात, तोंडाला काळं फासणार..., जरांगेंचा एकेरी उल्लेख करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचा इशारा
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Embed widget