Sanjay Pande Meet Uddhav Thackeray: मुंबईचे (Mumbai News) माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. दोघांमधील भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी ठाकरेंची भेट घेतली. पांडे आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना मोठं उधाण आलं आहे.
संजय पांडे यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) काळात मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तपदी कारभार पाहिला होता. काल (शुक्रवारी) रात्री उशीरा झालेल्या भेटीत संजय पांडे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप कळू शकलेलं नाही. उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे रात्री साधारणपणे एक तासभर उद्धव ठाकरे आणि संजय पांडे यांच्या दरम्यान भेट झाल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना जुलै 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात संजय पांडेंना झालेली अटक, प्रकरण काय?
संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास आठ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला (CBI) मिळाली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता. याचप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती.
संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आलेला. तसेच, NSE सर्व्हर कॉप्रमाईज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आलेलं. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. तसेच, संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केलं. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केलेली. चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता.