मुंबई: राजकारण आणि काँग्रेस पक्षातून संन्यास घेतलेले काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्या घरासमोर आज काँग्रेस समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

 

मुंबईत काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणणाऱ्या नेत्याचा राजकारणात अशा प्रकारे शेवट होणं योग्य नसल्याचं म्हणत, कार्यकर्त्यांनी या प्रश्नी पक्षनेतृत्वाला लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.



आपण राजकारणातून संन्यास घेतला असला तरीही सामाजिक कार्यात पक्षाला आपली गरज लागत असेल, तर आपण मदत करायला तयार असल्याचं कामत यांनी स्पष्ट केलं आहे.

 

पण आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता कामतांचं संन्यास घेणं पक्षासाठी योग्य नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

 

गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:


 

1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

 

1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर

 

पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व

 

2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम

 

केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार

 

2014  साली सेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव


संबंधित बातम्या


काँग्रेस नेते गुरूदास कामतांचा राजकारणातून संन्यास