एक्स्प्लोर
गिरगावातल्या मेहता मॅन्शन इमारतीला भीषण आग

मुंबई: मुंबईतल्या गिरगाव परिसरातील मेहता मॅन्शन इमारतीला भीषण आग लागली. ड्रीमलँड थिएटरजवळ ही दुर्घटना घडली आहे. आगीच्या ज्वाळा तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचल्यामुळं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसंच काही वेळापूर्वी सिलिंडरचा ब्लास्ट होऊन आग भडकल्याची माहिती मिळते आहे. ही आग अटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याशिवाय 8 पाण्याचे टँकर, 6 टँकर, 1 बीए व्हॅन घटनास्थळी दाखल आहेत. आगीचे स्वरुप अतिशय भीषण असून अग्निशमन दलाचे अधिकारी ही आग अटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप जिवीतहानीचं कोणतंही वृत्त नाही आहे.
Before You Go
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा





















