एक्स्प्लोर
मुंबईत घाटकोपर-मानखुर्द रोडवर गोदामांना आग
सुरुवातीला एका गोदमाला लागलेली आग पसरत गेली आणि 10 ते 12 गोदाम या आगीच्या कचाट्यात सापडले.
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा आग लागण्याची मोठी घटना समोर आली आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर रविवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मंडाले भागातील भंगाराच्या अनधिकृत गोदमांना आग लागली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आणि 10 वॉटर टँकरनी ही आग विझवली.
या गोदमांमध्ये प्लायवूड, कपड्याच्या चिंध्या, प्लास्टिक आणि ऑईल होतं. सुरुवातीला एका गोदमाला लागलेली आग पसरत गेली आणि 10 ते 12 गोदाम या आगीच्या कचाट्यात सापडले. त्यामुळे अनधिकृत गोदामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
झोपडपट्टीपर्यंत आग पोहचू नाही म्हणून अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement