एक्स्प्लोर
भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग
व्होल्टास कंपनीच्या एसी, फ्रिज आणि पंख्याच्या 4 गोदामालाही आगीने आपल्या भक्ष्यस्थानी घेतलं आहे.

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीतल्या इंडियन कॉर्पोरेशन गोदाम संकुलात भीषण आग लागली आहे. केमिकल गोदामाला लागलेली आग मोठी असल्यानं परिसरात धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. या आगीनं बाजूच्याच व्होल्टास कंपनीच्या एसी, फ्रिज आणि पंख्याच्या 4 गोदामालाही आपल्या भक्ष्यस्थानी घेतलं आहे. घटनास्थळी भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगरमधील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, अग्नीशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























