एक्स्प्लोर
मुंबईत एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये आग

मुंबई : मुंबईतील बीकेसीमध्ये असलेल्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूट या रुग्णालयामध्ये आग लागली आहे. इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची माहिती आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मध्ये असलेल्या प्रसिद्ध एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या इमारतीतील बेसमेंटमध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाचे सहा फायर इंजिन आणि चार वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र रुग्णालयात आग लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















