एक्स्प्लोर

पत्नीची पतीविरोधात लैंगिक छळाची तक्रार, वाईफ स्वॅपिंगचा धक्कादायक प्रकार समोर, पतीला अटक

वाईफ स्वॅपिंग प्रकरणात मुंबईत एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पतीने त्याच्या मित्रांकडून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पत्नीने केली होती.

मुंबई : मुंबईत एका मानसिक आणि शारिरीक आजाराने त्रस्त महिलेने तिच्या पतीविरोधात लैगिंक छळाची तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलिसांनी पती आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून हा वाईफ स्वापिंगचा धक्कादायक प्रकार असल्याचं समोर आलं आहे. तसेच पीडित महिलेनं पतीविरोधात अनैसर्गिक शारिरीक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याचाही आरोप केला आहे.

39 वर्षीय पीडित महिला ही डिसलेक्सिया या आजाराने ग्रस्त आहे. साल 2004 मध्ये या महिलेचा शेअर बाजारात कार्यरत असलेल्या जिग्नेश नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. लग्नानंतर अनेक वर्ष तिने कौटुंबिक हिंसाचार सहन केला. आपल्या दोन मुलांच्या भविष्याचा विचार करून पीडित महिलेने जिग्नेशचा हा छळ सहन केला. मात्र साल २०१७ पासून जिग्नेशने परपुरुषांशी शारिरीक संबंध ठेवण्यास आपल्याला भाग पाडले, तसेच या संबंधांचे व्हिडिओ बनवून कुणाकडेही याची वाच्यता न करण्याची धमकी दिली होती, असा आरेप पीडितेच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी जिग्नेश सोशल मीडिया साईट्सचा उपयोग करत होता. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर यासाठी सक्रिय असलेल्या ग्रुपमध्ये जिग्नेश बनावट अकांऊंट्ससह सहभागी होता याचे काही पुरावेही सापडले आहेत.

साल 2016 मध्ये पीडित महिलेच्या सासूचं निधन झाल्यानंतर हे प्रकार सुरू झाले. सासऱ्यांकडे याची तक्रार केली मात्र त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही, असा पीडितेचा आरोप आहे. मात्र गेल्या दोन वर्षात हे प्रकार वाढल्याने पीडित महिलेनं अखेरीस तिच्या माहेरच्यांना या अत्याचारांची माहिती दिली. त्यानंतर अॅड. स्वप्ना कोदे यांच्या मदतीने पीडेतेनं मुंबई पोलिसांत याची तक्रार दाखल केली.

मुलूंड पोलिसांकडून हे प्रकरण कांदिवलीतील समता नगर पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जिग्नेशला पोलिसांनी अटक केली असून बोरीवली कोर्टाने त्याला 23 डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget