एक्स्प्लोर

Kopardi Rape And Murder Case | दोषींच्या उपस्थितीत आजपासून अंतिम सुनावणी

कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी आजपासून मुंबई उच्च न्यायालयात दोषींच्या उपस्थितीत अंतिम सुनावणी सुरु होणार आहे. फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दोषींच्या विनंतीनंतर खटला औरंगाबादऐवजी मुंबई खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या अंतिम सुनावणीला आजपासून मुंबई उच्च न्यायालयात सुरुवात होणार आहे. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाही सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आरोपींनाही न्यायालयात हजर ठेवण्याचे निर्देश तुरुंग प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मागील सुनावणीच्यावेळी सरकारकडून अपील दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेत, अपीलाची कागदपत्रे आपल्याला मिळावीत अशी मागणी केली होती. तसेच खटल्याची सुनावणी मार्चपर्यंत तहकूब करावी, अशी विनंतीही केली होती. तर राज्य सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील यांनी जोरदार विरोध केला होता. तसेच अपीलाला झालेल्या विलंबाबाबत माफी अर्ज कोर्टापुढे सादर केला. तो मान्य करत खटल्यावर 25 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी घेण्याचे हायकोर्टाने निश्चित केले होते. कोपर्डीतील 15 वर्षीय शालेय मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार करुन तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले होते. यानंतर नराधमांना फाशी आणि अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात एकवटलेल्या सकल मराठा समाजाने राज्यभरात शांततापूर्ण विराट मोर्चे काढले. अनेक संघटनांनी आंदोलनं केली. त्यानंतर गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (वय 25 वर्षे), संतोष गोरख भवाळ (वय 30 वर्षे) आणि नितीन गोपीचंद भैलुमे (वय 26 वर्षे) या तिघा आरोपींना अटक करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, खून करणे, तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 18 नोव्हेंबर 2017 रोजी दोषी ठरवत, 29 नोव्हेंबरला फाशीची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. तर ही शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारनेही याचिका केली आहे. या खटल्यातील दोषी नितीन गोपीनाथ भैलूमने औरंगाबाद खंडपीठापुढील हा खटला मुंबईत वर्ग करण्याची विनंती केली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी ही विनंती मान्य करत हा खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केला.

महत्त्वाच्या बातम्या

FDA Action In Mumbai : अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
अस्वच्छ स्वयंपाकगृहे, झुरळ-माशांचा प्रादुर्भाव; FDA ची मुंबईतील प्रतिष्ठित क्लबसह पाच ठिकाणी कारवाई, क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा परवाना निलंबित
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, सात दिवसांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरा, विखे पाटलांचे निर्देश 
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 
सात बांगलादेशी तृतीयपंथींना मुंबईतून अटक, अवैधरीत्या भारतात प्रवेश करुन चालवत होते सेक्स रॅकेट, MIDC पोलिसांची मोठी कारवाई 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget