नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशीमधून 30 मार्चला गायब झालेल्या फेलसीना डिसूजा ( वय 51) अखेर सापडल्या आहेत. मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर बसल्या असताना एका व्यक्तीने त्यांना पाहिलं. पहाटे 5 वाजता त्यांच्या वाशीतील घरी आणून सोडलं.
फेससीना डिसूजा गेले 15 दिवस कुठे होत्या, याबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही. मुलगी सलोमी त्यांना घेऊन वाशी पोलीस ठाण्यात गेली आहे.
वाशी सेक्टर 28 येथे राहणाऱ्या फेलसीना डिसूजा भाजीपाला खरेदी करण्यासाठी सेक्टर 9 मध्ये जातात. 30 मार्चला भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडलेल्या डीसूजा परत घरी न आल्याने मुलगी सलोमी चिंतेत पडली. कारण वडील अगोदरपासूनच वेगळं राहतात. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या सलोमीने आईची शोधमोहीम सुरु केली होती.