एक्स्प्लोर
कुप्रसिद्ध मटका किंग बाबू नाडरवर ठाण्यात जीवघेणा हल्ला
काही अल्पवयीन मुलांनी मागील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलीस अधिक तपास करत आहे.
ठाणे : ठाणे, मुंबईमधील कुप्रसिद्ध मटका किंग बाबू नाडर याच्यावर कोपरी बस स्थानक परिसरात जीवघेणा हल्ला झाला. शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तीन अल्पवयीन मुलांनी हा जीवघेणा हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बसस्थानकाजवळ झालेल्या प्रकाराने कोपरी परिसरात काही काळ दहशत निर्माण झाली आहे. मटका किंग बाबू नाडरवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. या भागात हप्ता मिळण्याच्या वादातूनच हा प्रकार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे.
काही अल्पवयीन मुलांनी मागील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर बाबू नाडर याला जखमी अवस्थेमध्ये ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement