एक्स्प्लोर

शारीरिक संबंधांनंतर तरुणीची फेसबुक फ्रेंडकडून हत्या

फेसबुक फ्रेंडला पहिल्यांदाच भेटायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला आपला जीव गमावावा लागला आहे. मुंबईजवळील नालासोपारामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबई : फेसबुक फ्रेंडला पहिल्यांदाच भेटायला गेलेल्या 20 वर्षीय तरुणीला आपला जीव गमावावा लागला आहे. मुंबईजवळील नालासोपारामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीला शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव सुरु झाला, मात्र तिने डॉक्टरकडे जाण्यास नकार दिल्यानं 25 वर्षीय तरुणाने तिची हत्या केली. वाशीमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची नालासोपाऱ्यातील हरीदास निरगुडे या 25 वर्षीय तरुणाशी फेसबुकवर ओळख झाली. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये चॅटिंगही सुरु होतं. अखेर त्यांनी नालासोपाऱ्यात भेटायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे काल रविवारी तरुणी वाशीहून नालासोपाऱ्याला तरुणाच्या घरी भेटायला आली. भेटीवेळी तरुणानं तरुणीकडे शरीरसंबंधांची मागणी केली. दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले. मात्र तरुणीला रक्तस्त्राव सुरु झाला. तरुणाने तिला डॉक्टरकडे जाण्यास विचारलं. तरुणीने त्याला नकार दिला आणि निघण्याचा प्रयत्न केला. मात्र शूजची लेस गळ्याला आवळत तरुणाने तिची हत्या केली. तरुणीची हत्या करुन हरीदासने तिचा मृतदेह इमारतीच्या तळमजल्यावर पायऱ्यांशेजारी ठेवला. इमारतीतील रहिवाशांनी हा मृतदेह पाहून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी इमारतीतील रहिवाशांकडे तरुणीबद्दल चौकशी केली, मात्र तिला कुणीही ओळखत नसल्याचं सांगितलं. दरम्यान हरीदासच्या फ्लॅटमध्ये तरुणीच्या रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. यावेळी हरीदासने आपणच तरुणीची हत्या केल्याचं कबूल केलं. तसंच आपण शारीरिक संबंध ठेवल्याचही कबूल केलं. हा तरुण नालासोपाऱ्यात आपल्या बहिणीसोबत राहात होता. ज्यावेळी हे दोघं भेटले त्यावेळी आरोपीची बहिण घरी नव्हती. तरुणाच्या बेडवरही रक्ताचे डाग आढळून आले आहेत. वाशीमध्ये राहणारी ही तरुणी घरच्यांना न सांगता तरुणाला भेटायला आली होती. तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.  पोलिसांनी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Embed widget