एक्स्प्लोर

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेस-मेल रद्द

मध्य रेल्वेवर कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात आल्याने लोकल, एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.

मुंबई : मध्य रेल्वेवर कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल, एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री हार्बरच्या दोन्ही मार्गांवर म्हणजेच मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 5.30 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला, तर मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री 1.30 ते पहाटे 3.30 पर्यंत ब्लॉक घेतला गेला होता. या कालावधीत हार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल, एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले. ब्लॉकमध्ये हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द स्थानकांमध्ये दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णत: बंद केली गेली. मेल-एक्स्प्रेसवर परिणाम पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या आज रद्द केल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होणार आहे अमृतसर-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी मुंबई फास्ट पॅसेंजर, कन्याकुमारी-सीएसएमटी जयंती-जनती एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मुंबई मेल, गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंतच चालवल्या जातील. रविवारी सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सकाळी 9.05 वाजता आणि सीएसएमटी-केएसआर बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस सकाळी 10.10 वाजता सुटणार आहे. याशिवाय रविवारी मुंबईत येणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गाड्यांच्या वेळेची खात्री करुनच बाहेर पडण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Embed widget