मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचाव करताना सध्या आपण सगळेच मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल युक्त सॅनिटायझरचा वापर करतोय. पण हे सॅनिटाझर कोरोना विषाणूपासून जरी आपल्याला वाचवत असलं तरीही त्याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणामही दिसून येत आहेत. सामान्य लोकांकडे कोरोनाशी लढण्यासाठी दोन प्रमुख शस्त्र आहेत. ते म्हणजे सॅनिटाझर आणि मास्क. यातल्या सॅनिटायझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हातात सॅनिटायझरची बाटली आहे म्हणून मनमानी वापर चालणार नाही. सॅनिटायझरचा वापर काळजीपुर्वक केला पाहिजे असं त्वचारोग  डॉ, वैभव टापरे यांनी सांगितले आहे.


कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या व्हायरसच्या संक्रमणापासून दूर राहण्यासाठी प्रशासनाकडून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. मात्र, सॅनिटायझरचा अतिवापर केल्यामुळे अनेकांना आरोग्याच्या तक्रारी येत आहेत.


विधानपरिषदेसाठी काँग्रेसचं सरप्राईज पॅकेज, दिग्गजांना बाजूला सारत युवा नेते राजेश राठोड यांना संधी


सॅनिटायझर वापरताना कोणती काळजी घ्यावी?




  • सॅनिटाझरमध्ये 60-90 टक्के अल्कोहोलचं प्रमाण असतं. त्यामुळे सॅनिटायझर वापरल्यावर हात कोरडे पडू शकतात.

  • हात किंवा त्वचा कोरडी पडल्यास मॉश्चुरायझर वापरावं.

  • ज्यांना एक्झिमा किंवा सोरायसिस असे त्वचेचे रोग आहेत त्यांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

  • सॅनिटायझर फक्त हातावरच वापरावं, चेहऱ्यावर लावू नये.

  • सॅनिटायझर हे नाकावाटे किंवा तोंडावाटे शरिरात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

  • दारुची तल्लफ भागवण्यासाठीही सॅनिटाझर प्यायल्याच्या काही घटना मागच्या काळात घडल्या आणि त्याची जीवानिशी किंमत त्या लोकांना चुकवावी लागली. त्यामुळे सॅनिटायझरचा एखाद्या औषधापप्रमाणेच वापर करणं गरजेच आहे.

  • जोपर्यंत कोरोना आहे तोपेर्यंत सॅनिटाझरच्या वापराला पर्याय नाही. पण त्याचा मर्यादित आणि विचारपुर्वक वापर होणं गरजेचं आहे. जेणेकरुन कोरोनाशी लढताना दुसऱ्या कोणत्या व्याधी आपल्याला जडणार नाहीत.


जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याची माहिती शासनाकडून वेळोवेळी दिली जात आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग शिवाय स्वच्छता राखण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून केलं जात आहे. मात्र एक पाऊल पुढे जात काही संस्थांनी निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर सुरु केला होता. मात्र अशी जंतुनाशक फवारणी अपायकारक ठरू शकते, असं केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी निर्जुंतकीरणासाठी व्यक्ती किंवा समुहाच्या अंगावर रसायनांची फवारणी करण्यासाठी डोम किंवा टनेल यांचा वापर केला जात आहे. मात्र त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या रसायनामुळे व्यक्तीला अपाय होऊ शकतो. म्हणून फवारणीसाठी टनेल किंवा डोमचा वापर करू नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना केली आहे.


Sanitizer Tunnel | सॅनिटायझर टनेलविषयी पुण्यातील 4 शास्त्रज्ञांचं संशोधन, दहा दिवस स्वत:वरच केला प्रयोग