मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे राणेंचे पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणें यांनीही संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरु केली आहे.


राणे 27 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा ज्या दिवशी सुरु झाली तेव्हाच नितेश राणे यांनी आपल्या व्हॉट्सअॅपचा डीपी बदलून योग्य ते संकेत दिले होते. त्यानंतर आता त्यांची स्वाभिमान संघटनाही कामला लागली आहे.

त्यामुळे भाजप प्रवेशाआधी त्यांनी मोर्चेबांधणीही सुरु केली आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं राणे समर्थकही आता पुढे सरसावले असून आज जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

याआधी नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. एकाच वेळी पत्रकार परिषद बोलावण्यामागचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे आता राणेंच्या भाजप प्रवेशाच्या घडामोडींना आणखी वेग आला आहे.

संबंधित बातम्या :

राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!

नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?