एक्स्प्लोर

मी दाऊदच्या पत्नीशी बोलत नसल्याचं सिद्ध झाल्यावर मला आणि बायकोला हुश्श वाटलं : खडसे

दाऊदच्या बायकोशी मी बोलत असल्याचे संबंध जोडले गेले, असं सांगतानादाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं, हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही, हे कळल्यावर मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं, अशी मिश्किल टिपणीही खडसेंनी केली.

मुंबई : विरोधी पक्ष नेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला शालजोडे लगावले. आपल्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देताना खडसेंनी विधानसभेत तूफान फटकेबाजी केली. खोटे आरोप करणाऱ्यालाही शिक्षा करण्याबाबत कायदा करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. माझ्या जीवनात मी एकही निवडणूक हरलो नाही. चाळीस वर्षात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप-प्रत्यारोप सभागृहात होत राहणार. पण विरोधी पक्ष नेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती आहे, असं खडसे म्हणाले. 288 आमदारांपैकी भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज आहे उभा आहे. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही नाही, पण बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी मी बोलत असल्याचे संबंध जोडले गेले, असं सांगताना दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं, हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही, हे कळल्यावर मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं, अशी मिश्किल टिपणीही खडसेंनी केली. खडसे आपल्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देताना भावनिक झाले होते. एकही इंच जमीन घेतली नसताना, सर्व नियमांचं पालन करुनही माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली गेली. अँटी करप्शनकडून दोनदा चौकशी झाली, इन्कम टॅक्सची घरी धाड पडली. माझ्या बायका-पोरांना चौकशीसाठी नेण्यात आलं. मी जमीनदाराचा मुलगा आहे. शेतीव्यतिरिक्त माझा एकही उद्योग नाही. संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी करुन एकही अपसंपदा नाही, असं चौकशीतून स्पष्ट झालं. एकही शैक्षणिक संस्था नाही कारण डोनेशन घेण्याचा कधी दमच नव्हता, असं खडसेंनी सांगितलं. मी शेवटच्या दिवशी यासाठी उभा आहे कारण हा भ्रष्ट, नालायक, चोर उचक्का सदस्य म्हणून या सभागृहातून मला जायचं नाही. सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हा डाग मला घेऊन जायची संधी देऊ नका. खोटे आरोप करणाऱ्यालाही शिक्षा करण्याबाबत कायदा करा, आरोप करुन एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. विनापुरावे आरोप करणारा व्यक्ती आज घरी आहे. काय न्याय आहे या राज्यात? कोणाच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये. यापेक्षा वाईट कोणाच्या जीवनात काही होऊ शकेल असे वाटत नाही. काही चुकीचं बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो, असं म्हणत खडसेंनी भाषण आटोपतं घेतलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget