एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड
मिलिंद देवरा यांनी 7 जुलैला मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे.
मुंबई : काँग्रेसचे नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकांनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षपद सोडणाऱ्या मिलिंद देवरांचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे.
मिलिंद देवरा यांनी 7 जुलैला मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई काँग्रेसला योग्य दिशा देणे आणि संघटीत ठेवण्याचं काम करत राहणार असल्याचंही मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तीन सदस्यीय समिती स्थापन करावी अशा सूचनाही देवरा यांनी दिल्या होत्या.
एकनाथ गायकवाड दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र 2014 आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळेंनी त्यांचा पराभव केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement