प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देणाऱ्या मेहुल चोक्सीसाठी एअर अँब्युलन्स पाठवण्याची तपासयंत्रणेची तयारी
मागील आठवड्यात पंजाब नॅशनल बँकेच्या हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते.

मुंबई : प्रकृती अस्वास्थामुळे भारतात येण्यास नकार देणाऱ्या मेहुल चोक्सीसाठी आता 'एअर अँब्युलन्स' पाठवण्याची तयारी तपासयंत्रणेनं दर्शवली आहे. 'मला भारतापर्यंतचा प्रवास झेपणार नाही, तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनीच अँटिंग्वाला चौकशीसाठी यावं, अथवा व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे चौकशी करावी', असा कांगावा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीनं केला आहे.
मागील आठवड्यात पंजाब नॅशनल बँकेच्या हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोक्सीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. 'मी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणास्तव भारतात येऊ शकत नाही. मला हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे मी लांबचा प्रवास करु शकत नाही.
ईडीच्या अधिकाऱ्यांनीच अँटिंग्वा येथे यावे आणि हवी ती चौकशी करावी किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझी चौकशी करावी, असे मेहुल चोक्सीने प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. याला आता ईडीच्या वतीनं प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यात आले आहे.
मेहुल चोक्सी हा केवळ प्रकृतीचा कांगावा करुन तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहे, असं ईडीने यात म्हटलं आहे. आम्ही त्याच्यासाठी डॉक्टरांनी सज्ज असलेली एअर ऍम्ब्युलन्स पाठवतो, मात्र त्याने भारतात परत यावे, असं ईडीने कोर्टात दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
Before You Go
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?






















