मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली असतानाच आता राज्याच्या कृषी विभागाचीही ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात 2008 ते 2011 या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता. ठिबक आणि स्प्रिंकलर संचाच्या खरेदीत झालेल्या या घोटाळ्याप्रकरणी 2011 साली तत्कालीन कृषी मंत्री विखे पाटील यांनी विधानसभेत काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा केली होती. पण घोषणेपलीकडे या प्रकरणात काही कारवाई झाली नाही. या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या आधारावर कृषी खात्यातील दक्षता विभागाकडून ईडीने काही कागदपत्र मागितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर 


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज चौकशीसाठी ED कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्या उद्या 5 जानेवारी रोजी चौकशीसाठी दाखल होणार होत्या. मात्र त्या आजच ईडी कार्यालयात हजर झाल्या. दरम्यान, ईडी कार्यालयाबरोबर हळूहळू शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे. मात्र आम्ही राऊतांना समर्थन देण्यासाठी आलो आहोत, या नोटिशीला घाबरत नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांना रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. वर्षा राऊत यांना 11 डिसेंबर रोजी नोटिस बजावण्यात आली होती. त्यावेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते. परंतु वर्षा राऊत 28 डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे आज त्या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.


ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक
गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता होती. उद्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात होतं. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार होते, अशी माहिती मिळाली होती.


संबंधित बातम्या