ई-चालानमुळे चोरीच्या गाड्या, खोट्या नंबर प्लेट वापरणाऱ्यांना चाप 


मुंबई :  मुंबई वाहतूक पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात ई-चालान घेताना संशयास्पद नंबर प्लेटच्या 24 वाहने ताब्यात घेतली आहेत.  त्यापैकी तीन चोरीची वाहने आहेत तर पाच वाहनांच्या नंबर प्लेट बनावट असल्याचे निदर्शनास आले असून उर्वरित वाहनांची  पडताळणी केली जात आहे. ई-चालान प्रणालीमुळे वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्यांना दंड करणे आणि वाहन चोरीचे प्रकरणं सोडवणे पोलिसांना सोपे झाले आहे.


ई चालानमुळे चोरीचे गाड्या कशा पटकन कळून येतात?


एखादे वाहन चोरल्यानंतर, त्या वाहनाची पुन्हा विक्री करताना बनावट नंबर प्लेटचा वापर केला जातो. चोरी केलेल्या वाहने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात तेव्हा वाहनांवर असलेल्या बनावट नंबर प्लेटच्या आधारे ई-चालान दिले जातात.  तथापि, नवीन स्कॅनिंग सिस्टममुळे हे चालान वाहनाच्या मूळ मालकाकडे जाते आणि यामुळे पोलिस चोरी झालेल्या वाहनांचा मागोवा घेण्यास मदत करतात. 


यावर्षी ई-चालान प्रणाली अद्ययावत करण्यात आली असून यात संशयास्पद नोंदणी क्रमांक जोडण्यात आले असल्याचं मुंबई ट्रॅफिकचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 


ट्रॅफिक पोलिसांना आता ही प्रणाली अद्ययावत झाल्याने चोरी केलेली वाहने, गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने आणि बनावट नंबर प्लेट असलेल्या वाहनांचा मागोवा घेणे आता सोपे होईल. ई-चालान प्रणालीला संशयास्पद नोंदणी क्रमांकाची राज्यव्यापी यादी जोडली गेली आहे. ज्यामुळे लोकांनाही कळण्यास सोपं होईल की कुठली गाडी खरी खरी आहे आणि कुठली चोरीची. 


नुकताच घाटकोपरमधील एका वाहनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि ई-चालान जारी केले, त्यानंतर हा नंबर बनावट असल्याचे समजले. प्रथम तपासणीत या वाहनाची नंबर प्लेर बनावट असल्याचे निदर्शनास आले आणि प्रकरण संबंधित पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी उद्योगपती रतन टाटा यांच्या गाडीचा बनावट नंबर प्लेट एका महिलेकडून वापरला जात होता आणि जेव्हा-जेव्हा ती गाडी वाहतुकीचे नियम मोडत होती त्याचं चालान रतन टाटा यांना जात होतं. ई-चालान मुळे हे प्रकरण उघडकीस आलं होतं.