एक्स्प्लोर

Dr.Payal Death Case | डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी दुसऱ्या आरोपी डॉक्टरला अटक

आहुजाला रात्री अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती. काल रात्रीच डॉ.हेमाला वैद्यकीय तपासणी साठी पोलिसांनी जेजे रुग्णालयात आणले तिथून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली

मुंबई : नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. डॉ भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सेशन कोर्टच्या बाहेरून तर डॉ.हेमा आहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून आगरीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. हेमा आहुजाला रात्री अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती. काल रात्रीच डॉ.हेमाला वैद्यकीय तपासणी साठी पोलिसांनी जेजे रुग्णालयात आणले तिथून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. या प्रकरणात आता फक्त डॉ.अंकिता खंडेलवाल ही आरोपी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. काल रात्री उशिरापर्यंत आगरिपाडा पोलीस या तपासात गुंतलेली होती. नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मंगळवारी आरोपी डॉक्टर भक्ती मेहेरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.  याप्रकरणी तिनही आरोंपीविरोधात अँटी रॅगिंग अॅक्ट आणि एट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. अंकिता खंडेलवाल, हेमा आहुजा या दोन आरोपींनी सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी सखोल आणि कडक तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना दिले आहे. तसेच आठ दिवसांच्या आत तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेशही दिला आहे. पायलची आत्महत्या नसून तिची हत्या : आई-वडील पायलने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पायलच्या आई-वडिलांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. दरम्यान, पायलच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांना अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याचे महाजनांनी सांगितले. तसेच युनिट हेडला निलंबित केल्याचे महाजन यांनी सांगितले. काय आहे प्रकरण? रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल  तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली.  मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता विविध संघटनांच्या वतीने आंदोलनं केली जात आहेत. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. डॉ.पायल नायर रुग्णालय मंबईमध्ये शिक्षण घेत होती. 1 मे 2018 रोजी तीला मागासर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तरुणीने वारंवार डीनकडे तक्रार देखील केली होती. पण तरीसुद्धा त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. पायलच्या आईने देखील या घटनेआधी नायर रुग्णालयाच्या डीनला पत्र लिहून याबाबत कळविले होते.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget