Virar News : विरारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Dr. B.R. Ambedkar Jayant) पूर्व संध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली आहे.  मिरवणुकीवेळी इलेक्ट्रिक वायरला झेंड्याचा स्पर्श झाल्यानं स्फोट झाला. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना विरार पूर्व कारगिल नगरमध्ये घडली. जखमींवर मुंबईच्या (Mumbai) कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


तीन जणांचा प्रकृती गंभीर


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्व संध्येला निघालेली मिरवणूक संपवून परत जात असताना लोखंडी झेंड्याचा पाईप विजेच्या ट्रान्सफार्मरला लागल्याने स्फोट झाला. यामध्ये सहा जण गंभीर भाजले असून, यातील दोन जणांचा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विरार पूर्व कारगिल नगर येथे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने विरार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


रुपेश सुर्वे ( वय 30), सुमित सुध (वय 23) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर स्मित कांबळे (वय 32)  सत्यनारायण पंडित (वय 23),  उमेश कानोजिया (वय 18), राहुल जगताप (वय 18) रोहीत गायकवाड अशी जखमींची नावे आहेत. विरार पूर्व कारगिल नगरमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री साडे दहा वाजता मिरवणूक संपल्यानंतर परत जात असताना हात गाड्यावर लावलेला लोखंडी झेंड्याचा रस्त्याच्या बाजूच्या विजेच्या ट्रान्सफर्माला स्पर्श झाला. त्यामुळं स्फोट होऊन ही दुर्दैवी घटना  घडली आहे.


राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमक


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान, चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे. यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे सायंकाळी करण्यात येणार आहे. बीएमसीकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


आंबेडकर जयंती! 12 एसआरपीच्या तुकड्या, 81 पिक्स पॉईंट; असा असणार छ. संभाजीनगरमध्ये बंदोबस्त