एक्स्प्लोर

CSMT पूल दुर्घटना : नाईट शिफ्टला निघालेल्या डोंबिवलीच्या तीन नर्स परतल्याच नाहीत...

सीएसएमटीमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेत डोंबिवलीतील तिघी नर्सचा मृत्यू झाला. जीटी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे या तिघी नाईट शिफ्टला जाताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडले

मुंबई : मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या पूल दुर्घटनेत डोंबिवलीच्या तीन परिचारिकांनी आपले प्राण गमावले. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे या तिघी काल संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्यासाठी घरुन निघाल्या, त्या कधीही परत न येण्यासाठीच. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे या तिघी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल अर्थात जीटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या. सीएसएमटी स्थानकाबाहेर पूलाचा भाग कोसळला आणि त्यात या तिघींचाही मृत्यू झाला. या घटनेने त्या राहात असलेल्या परिसरावर शोककळा पसरली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर पूल पडल्याचं समजताच हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या सुश्रुषेसाठी तत्पर झालं. या दुर्घटनेत काही जणांनी जीव गमावले असतील, याची त्यांना कल्पना होतीच. मात्र अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे यांना रुग्णालयात आणल्याचं पाहताच अनेकांच्या काळजात धस्स झालं.
मुंबई पूल दुर्घटना : 'लोकांनी व्हिडीओ बनवण्याऐवजी मदत केली असती तर माझा भाऊ वाचला असता'
'त्या आमच्याच रुग्णालयातील कर्मचारी होत्या. आम्हाला पटकन ओळख पटली. रात्री 8 वाजता नाईट शिफ्ट सुरु होते. त्या ड्यूटीवरच येत होत्या' असं रुग्णालयातील एका वरिष्ठ नर्सिंग स्टाफने सांगितलं. तिघीही जणी डोंबिवलीला राहत असल्याने नाईट शिफ्ट असल्यावर त्या एकत्रच प्रवास करायच्या.
 VIDEO | मुंबई पूल दुर्घटनेत जी टी रुग्णालयातील 3 परिचारिकांचा मृत्यू
अपूर्वा प्रभू यांचे पती अभय यांनी टीव्हीवर अपघाताची बातमी पाहिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. 'ट्रेन पकडल्यावर मी तिच्याशी फोनवरही बोललो होतो. तिच्यासोबत भक्ती आणि रंजना या दोघी स्टाफही होत्या' असं अभय यांनी सांगितलं.
'टीव्हीवर तिचं नाव दिसताच मी तिला फोन करायला सुरुवात केली. पण तिच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता' असं सांगता अभय प्रभू भावविवश झाले.
VIDEO | सीएसएमटी पूल दुर्घटना, प्रत्यक्षदर्शीने टॅक्सी चालकाने काय पाहिलं? 
 अपूर्वा आणि रंजना यांना जीटी रुग्णालयात, तर भक्ती शिंदे यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं. नेहमी त्यांच्यासोबत येणारी एक नर्सही आठवणींनी गहिवरली. आम्ही एकत्रच यायचो, पण मला खरेदी करायची होती, म्हणून मी लवकर निघाले होते, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
CSMT पूल दुर्घटना : वडिलांनंतर घराचा आधार झालेला मुलगाही गेला, तपेंद्र सिंगचा मृत्यू
मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, सहा जणांचा मृत्यू, 32 जखमी
होय तो पूल आमचाच आहे, टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली
मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding : पेट्रोल भरायला आला आणि  काळाने घाला घातला...घाटकोपर दुर्घटनेत तरुणाचा मृत्यूABP Majha Headlines : 10 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Amit Shah Exclusive : राज्यात पक्षफुटीचा फायदा की तोटा? अमित शाह यांची सडेतोड मुलाखत!ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget