Dombivali News :  डोंबिवलीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडून एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळं संर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. या  प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे .बांधकाम सुरू असलेली सदर आठ मजली इमारत अनधिकृत असून 21 तारखेला सदर इमारत  पाडण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती केडीएमसीने दिली आहे. तर मानपाडा पोलिसांनी जबाबदार बिल्डरविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले


 डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य यांचा एकुलता एक मुलगा सत्यम  मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खेळण्यास गेला. मात्र बराच कालावधी उलटूनही परतला नाही. बऱ्याच वेळ शोधाशोध करून ही सत्यम न सापडल्याने कुटुंबीयांनी आजूबाजूच्या इमारतीमध्ये शोध घेतला. शेजारी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये लिफ्टमध्ये तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला. 


एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या आई वडिलांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आाहे. या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने सदर इमारतही बेकायदा असल्याचे सांगत या इमारती संदर्भात वेळोवेळी बिल्डरला नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.  येत्या 21 तारखेला ही इमारत पाडण्यात येईल अशी माहिती केडीएमसीचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली आहे. सत्यमच्या मृत्यूला जबाबदार धरत डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. निष्काळजी केल्याप्रकरणी बिल्डरच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल असे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :