Mumbai Local Update :  मुंबईची लाईफलाईन म्हणून ट्रेनची ओळख आहे. मुंबईत दररोज हजारो महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. याच लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आता मुंबई रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने मार्च 2023 पर्यंत सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2021 रोजी मुंबई विभागाच्या मध्य रेल्वेने महिला प्रवाशांच्या डब्यात 605 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. आतापर्यंत, मध्य रेल्वेने महिला डब्यांमध्ये आणि वेगवेगळ्या स्टेशनवर एकूण 3,122 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 


महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे


महिला रेल्वेतून प्रवास करताना त्यांच्याबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याकरता, येत्या एक वर्षात मुंबई मध्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होणाऱ्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वेकडून नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. कंट्रोल रूममध्ये, RPF कर्मचारी हे महिलांचे डबे आणि स्टेशन परिसरात दिवसाचे 24 तास घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवतील. 


'मेरी सहेली' मोहीमेची सुरुवात 


मध्य रेल्वेचे सीपीआरओ Chief Public Relations Officer शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुंबई विभागाची मध्य रेल्वे नेहमीच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असते. महिलांच्या सुरक्षेबाबत मध्य रेल्वेकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. आरपीएफ आणि जीआरपीच्या महिला पोलिसांमुळे लांबचा प्रवास करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढविण्याकरता गेल्या वर्षी 'मेरी सहेली' मोहिमेची सुरुवात वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती.


3,000 हून अधिक सीसीटीव्ही बसवले


शिवाजी सुतार म्हणाले, "प्रवासात महिला प्रवाशांना काही अडचण आल्यास त्या महिला प्रवाशांची समस्या सोडविण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफच्या महिला पोलिस मदत करतात. आता  महिलांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंतर्गत धावणाऱ्या सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.  आतापर्यंत एकूण 3,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, जे महिला डबे आणि स्थानक परिसरात बसविण्यात आले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha