Solapur Barshi Froud Case : मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम' ची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. आता या प्रकरणात मोठं अपडेट समोर आलं असून स्वत: विशाल फटे यानं एक व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटेनं स्वतःची बाजू मांडली आहे. लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्या त्यामुळे पैसे अडकले. मला माझ्या चुका मान्य असून मी शिक्षा भोगायला तयार आहे. आज पोलिसात हजर होणार असल्याचंही तो म्हणाला.
स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून घडलेल्या गोष्टींबाबत त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. 27 मिनिटं 37 सेकंदचा व्हिडीओ अपलोड करून स्वतःची बाजू त्यानं मांडली आहे. विशालनं म्हटलं आहे की, अनेकांनी चर्चा केली की 200 कोटींचा घोटाळा आहे. मात्र जास्तीत जास्त 10 कोटी रुपये मला लोकांचे द्यायचे आहेत, असं तो म्हणाला.
तो म्हणाला की, मी इज्जतीला घाबरुन सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. अंबारेनं माझ्याविरोधात केस केली. त्यानं मला विचारायला हवं होतं. त्याच्याकडं जमीन गाड्या, सोनं झालं, असं तो म्हणाला. सहा महिन्याच्य वर मी कुणाचेही पैसे ठेवले नाही. माझ्यावर त्यानं पुरावे नसताना आरोप केले, असं तो म्हणाला.
10 लाखाचे 6 कोटी करणार याबाबतही चर्चा केली. मी सगळा डेटा लोकांना दिलाय. मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते आणि नाहीत. दोन दिवसात मी गोष्टी मॅनेज केल्या असत्या पण अचानक केसेस पडू लागल्या. ज्या लोकांकडून पैसे येणं अपेक्षित होतं ते आले नाहीत. सगळ्या वाईट गोष्टींची चैनच सुरु झाली. आता माझ्या आवाक्याच्या बाहेर गोष्ट केली. लोकांनी मला वेळ दिला नाही. आता मला त्यांनी वेळ द्यावा अशी अपेक्षाही नाही, असं तो म्हणाला.
इतर महत्वाच्या बातम्या
- 'फटे स्कॅम'प्रमाणंच मराठवाड्यात 'तीस-तीस स्कॅम'ची चर्चा! 400 कोटींपेक्षा मोठा घोटाळा
- Solapur : सोलापूरच्या बार्शीत शेकडो कोंटीच्या 'स्कॅम'मुळं खळबळ,विशाल फटे विरोधात तक्रारींचा पाऊस
- Solapur, Barshi : सोलापूरच्या बार्शीत शेकडो कोटींच्या 'स्कॅम'मुळं खळबळ , मुख्य आरोपी विशाल फटे फरार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha