मुंबई : जर तुम्ही मुंबई लोकलनं प्रवास करत असाल आणि त्यातल्या त्यात मध्य रेल्वेवरुन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची. मध्य रेल्वेवर येत्या  शनिवारी आणि रविवारी (22 -23 जानेवारी)  पुन्हा एकदा चौदा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर असणार आहे. डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगा ब्लॉकची सुरुवात शनिवारी मध्यरात्रीनंतर 01 वाजून 20 मिनिटांनी होईल, तर रविवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटंपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.


  मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अप फास्ट मार्गीकेवर दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 वाजून 30 मिनिटांनी संपेल. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धीम्यामार्गीकेवर लोकल धावतील. शनिवारी या ब्लॉगच्या आधी दादर येथून सुटणाऱ्या जलद लोकल आणि एक्सप्रेस 11 वाजून 40 मिनिटांपासून ते रात्री  दोन वाजेपर्यंत माटुंगा आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान डाऊन स्लो लाईन वरून धावतील. या काळात काही एक्सप्रेस ठाणे स्टेशनवर थांबणार नाहीत. 


तर ब्लॉक सुरू झाल्यानंतर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी इथून सुटणाऱ्या एक्सप्रेस, तसेच फास्ट लोकल या मुलुंड आणि कल्याणच्या दरम्यान डाऊन स्लो लाईनवर डायव्हर्ट करण्यात येतील. असे असले तरी मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्म वर एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबणार नाहीत असे मध्य रेल्वेने सांगितले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Mumbai Local Mega Block : 4 ते 6 फेब्रुवारी, मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगाब्लॉक; पाचवी-सहावी मार्गिका 6 फेब्रुवारीला खुली होणार