डोंबिवलीच्या 27 गाव संघर्ष समितीचा मोर्चा, स्वतंत्र नगरपालिकेची मागणी
डोंबिवली आणि ग्रामीण परिसरातील 27 गावं मागील महापालिका निवडणुकीत केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. मात्र त्यानंतरही या गावांचा विकास झालेला नसून आता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनही बँड करण्यात आलं आहे.

कल्याण : डोंबिवलीच्या 27 गावातील ग्रामस्थांनी आज भव्य मोर्चा काढला. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका घोषित करण्यासह बँड केलेलं प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
डोंबिवली आणि ग्रामीण परिसरातील 27 गावं मागील महापालिका निवडणुकीत केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. मात्र त्यानंतरही या गावांचा विकास झालेला नसून आता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनही बँड करण्यात आलं आहे. त्यामुळे पुनर्विकासासह अनेक प्रकल्प रखडले असून याचा ग्रामस्थांना प्रचंड मोठा फटका बसत आहे.
या सगळ्याबाबत केडीएमसीपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे दाद मागूनही काहीही उपयोग होत नसल्यानं अखेर आज 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं डोंबिवलीत भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह तब्बल 3 ते 4 हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी येत्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
