एका व्यक्तीला विमानतळावरच अस्वस्थ वाटू लागलं होतं. विमानतळ परिसरातच कोसळलेल्या त्या प्रवाशाभोवती गर्दी जमली होती.
तेव्हा दुबईहून आपल्या कुटुंबासह परतलेल्या ठाण्याच्या डॉ. गायत्री पाटणकर यांनी तिकडे धाव घेत, लागलीच त्या व्यक्तीवर उपचार केले.
या व्यक्तीला श्वसनाचा त्रास होत होता. त्याला कार्डिअॅक अरेस्ट आल्याने, या रुग्णाच्या बाबतीत पहिली पाच मिनिटं अत्यंत महत्वाची होती. श्वास घेणं अवघड झालेल्या या रुग्णावर, डॉ. पाटणकर यांनी प्रथमोपचार केले.
नीलमणी शर्मा असं या रुग्णाचं नाव असून सोमवारी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. या रुग्णाच्या बाबतीत पहिली पाच मिनिटं अत्यंत महत्वाची होती असं सांगत मुंबई विमानतळावर वैद्यकीय उपचार केंद्र असायला पाहिजे असं मत डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केलं.