एक्स्प्लोर

DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?

DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा तपशील समोर आला नसला, तरी सद्य राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा केली.

DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज (20 जून) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्याकडून डी. के. शिवकुमार यांना शाल देत त्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. रश्मी ठाकरे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पुन्हा एकदा फुटीमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधान परिषद निवडणुकीमध्ये डीके शिवकुमार यांनी थेट भाजपचेच आमदार फोडत पाचवी जागा अशक्यप्राय असतानाही जिंकली. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दुसरीकडे या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा तपशील समोर आला नसला, तरी सद्य राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा केली. अर्ध्या तासाच्या चर्चेनंतरडीके सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीच्या लग्नासाठी पोहोचले. आज  राज्यासह देशभरातून रेवतीच्या लग्नासाठी नेतेमंडळी पोहोचले आहेत.  

दुसरीकडे, डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्नाटकात झालेल्या पहिल्या निवडणुकीत, सत्ताधारी काँग्रेसने विधान परिषदेच्या सातपैकी पाच जागा जिंकल्या, तर विरोधी भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांच्या आमदारांनी क्रॉस-व्होटिंग केले, ज्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली. कर्नाटक विधानसभेच्या सदस्यांनी विधान सौध निवडणुकीत मतदान केले. या सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजपने देशव्यापी दाखवलेला फंडा भाजपविरोधात वापरत डीकेंनी दणक्यात सुरुवात केली आहे. 

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये काँग्रेसचे थिप्पनप्पा कामकनूर, पी.व्ही. मोहन, बी.के. हरिप्रसाद (राज्य काँग्रेस अध्यक्ष), शिवण्णा बी.एस., विनय कार्तिक प्रकाश, भाजपचे लिंगराज पाटील आणि रघु आर., आणि जेडीएसचे गोविंदराजू यांचा समावेश आहे. काँग्रेसचे सर्व पाच उमेदवार आणि भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले, तर जेडीएसचे गोविंदराजू पराभूत झाले. विधान परिषदेच्या सात सदस्यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत असल्याने ही निवडणूक झाली होती. यामध्ये काँग्रेसचे नसीर अहमद, टिपन्नप्पा आणि बी. के. हरिप्रसाद, भाजपचे एन. नागराजू (एमटीबी), प्रताप एस. नायक के. आणि सुनील वल्लैयापूर, तसेच जेडीएसचे गोविंदराजू यांचा समावेश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget