मुंबई : राज्यातील इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या रक्कमेची दिवाळी भेट जाहीर केली असताना पोलिसांना मात्र तुटपूंजी भेट दिल्याच्या बातम्या काल पासून सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र ही दिवाळी भेट राज्य सरकारची नसून मुंबई पोलिस कल्याण निधीतून देण्यात आल्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना काळात मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणा-या अडचणी टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई शहर पोलीस दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई, आणि छोटीसी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. दिवाळी शुभेच्छा खर्चासाठी मुंबई पोलीस कल्याण निधीचा वापर करण्यात येतो. ही योजना राज्यशासनाची नसून पूर्णतः पोलीस कल्याण निधीची योजना आहे. यंदा मुंबई पोलीसांकरिता कार्यरत असलेल्या सहा पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर 750 रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना काळात रात्र-दिवस काम करणाऱ्या पोलिसांना केवळ 750 रुपयांची 'दिवाळी भेट'
गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्र, मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना येणा-या अडचणी टाळण्याच्या उद्देशाने भेटवस्तूंऐवजी सदर रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे. 'या' निर्णयामुळे पोलीस सबसिडीयरी कॅन्टीन मधून खरेदी केलेले साहित्यावर तीस टक्के सवलत मिळते आहे . याबरोबरच यावर्षी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पसंतीचे व आवश्यक असे दिवाळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यामधील 750 रु किंमतीचे साहित्य देखील विनामूल्य मिळणार आहे.
पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, प्रोत्साहन,विविध अधिकारी कर्मचारी सत्कार,आरोग्यविषयक सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय तसेच पोलिसांच्या कल्याणासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून मुंबई पोलीस आयुक्तालय दिवाळी शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू स्वरूपात दरवर्षी देत होते.
महत्वाच्या बातम्या :
- मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार, प्रत्येकी 20 हजारांचा दिवाळी बोनस
- MSRTC Staff Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर
- Thane TMC : आर्थिक संकटात असलेल्या ठामपाच्या कर्मचाऱ्यांना 15,500 दिवाळी बोनस, महापौर नरेश म्हस्के यांनी केली घोषणा