मुंबई : मी मुंबईची धारावी. माझं नाव काढलं तरी अनेकजण अजूनही नाकं मुरडतात. माझ्या अंगच्या वासानं नाका-तोंडाला रुमाल लागतात. आशिया खंडातली सगळ्यांत मोठी झोपडपट्टी, अशी माझी ओळख. पण, अख्ख्या जगाच्या नाकाला रुमाल लावणाऱ्या कोरोनानं माझ्या वस्तीतही एन्ट्री केली. परदेशातल्या विमानानं आलेला कोण कुठला तो कोरोनाला माझी वस्ती भलतीच आवडली आणि मग काय मला कोरोना हॉटस्पॉटचा किताबच मिळाला. पण, आता मला आणखी एक किताब मिळतोय कोरोनाशी टक्कर घेणा-या कोविड योद्धा धारावीचा किताब.


गेले तीन महिने आपण सगळेच कोरोनाचं थैमान बघतोय. पण, या स्थितीतही पाय घट्ट रोवून उभ्या राहणाऱ्या धारावीकरांनी जे करुन दाखवलंय ते अजून भल्या भल्ययांनाही जमलेलं नाही. मुंबईत सर्वात मोठ्ठा हॉटस्पॉट असलेल्या माझ्या अरुंद गल्ल्या. मंगळवारच्या 24 तासात इथे फक्त 1 रुग्ण सापडलाय. पाठोपाठ संपूर्ण मुंबईतही पहिल्यांदाच एका दिवसात 806 इतके सर्वांत कमी कोरोनारुग्ण आढळलेत. कोरोना हॉटस्पॉट धारावी ते कोरोनाशी टक्कर घेणारी डॅशींग धारावी असा माझा गेल्या दोन महिन्यातला प्रवास राहिलाय. या प्रवासादरम्यान मी बरंच काही अनुभवत होती आणि अजूनही अनुभवतेय.


बरीच वर्षे उत्तर प्रदेश मधलं आपलं गाव सोडून कायमचा माझ्या गल्लीत वस्तीला आलेला टॅक्सीवाला चाचा म्हणतो, "धारावी में अब धीरे धीरे सब ठिक हो रहां हैं, पहले काफी डर था. लेकीन अब धारावी रेड से ग्रिन झोन की तरफ बढ रहीं हैं. वैसे तो धारावी सुधरने का क्रेडीट तो पुलिस और डॉक्टर को जाता हैं. अब वो धारावी पहले जैसी नहीं रहीं."


धारावी तिच्या लघुउद्योगांमुळे ओळखली जाते. येणाऱ्या राखी पौर्णिमेसाठी राखीच्या कारखान्यातील लघुउद्योजक आता कामाला लाागलेत. पण मेड इन धारावी राखी खरंच आता कुणी विकत घेईल का? ही शंकादेखिल मनात आहेच. राखी तयार करणारे कारागिर म्हणतात, "एक तो बाहरसे कोई यहांपर अभी आते नहीं हैं, कारागिर सब गांव में ही जाकर रह गये, लेकीन जो यहां पर थे उन्होंने राखीयां बनायी. अब फोन पर जितने ऑर्डर ले सकते है उतने लेते हैं. अब आप ही बता दो की धारावी पहले जैसी नहीं रहीं. यहां का माहौल अब अच्छा हुआ है तो लोग सुनेंगे"


दिलासादायक...! मुंबईत काल एका दिवसात फक्त 806 कोरोना रुग्ण, तर धारावीत 1 रुग्ण


धारावीतला आणखी मोठा व्ययवसाय म्हणजे इथली लेदर फॅक्टरी. अगदी ब्रॅन्डेड वस्तुंच्या तोडीस तोड वस्तु इथे बनतात. 90 फीट रोडवरच्या चप्पल बनवणाऱ्या लेदर फॅक्टरीत जाताना आधी सॅनिटायझेशन आणि स्क्रिनींग होतं. मग आत एक-दोन फुटाचं अंतर सोडून पिपीई किट घालून लेदरच्या तुकड्ययांवर ठाकठोक करणारे कारागिर दिसतात. चेहऱ्यावर मास्क, फेस शिल्ड, हातमोजे आणि पिपीई किट असा सगळा जामानिमा सांभाळत फुल्ल स्पीडच्या फॅनखाली हे काम करत आहेत.


यांचा कारखानदार म्हणतो, "आम्ही चांगल्या ब्रॅन्ड दर्जाच्या चपला बनवतो. पिढीजात धंदा आहे. लॉकडाऊनमुळे 3 महिने घरीच होतो. कामगारांना कसाबसा पगार दिला. पण, आता नुकसान भरुन काढण्यासाठी चपलांबरोबर डिझायनर मास्क पण तयार करतोय"


धारावीला पुन्हा या आत्मविश्वासानं उभं करायला आधार दिला तो इथल्या डॉक्टरांनी आणि बिएमसी प्रशासनानं. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाकडे बोट करुन दारं बंद करणं सोपंच असतं. पण, माणुसकी आणि कर्तव्याला जागुन, काटेकोर नियम पाळून धारावीला पुन्हा उभं केलं ते इथल्या कोविड योद्धांनी.


डॉ. अनिल पाचणेकर हे धारावी-माहिम डॉक्टटर्स असोसिएशनचे अध्यक्ष. वय वर्षे 60 पण, गेले 2 महिने सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत एकही दिवस खंड न पाडता क्लिनीक चालवणारे डॉक्टर. यांच्या टीमनं धारावीतल्या हजारो लोकांच्या स्क्रिनींग मोफत केली. धारावी एका मोठ्या संकटातून बाहेर यायला मदत झाली. डॉ. पाचणेकर सांगतात, "अनेक डॉक्टटरांनी कोरोनाच्या काळात स्वत:चे खाजगी दवाखाने बंद ठेवले. मात्र, धारावीतल्या 200 डॉक्टटरांची टिम बिएमसीसोबत उभी राहिली. आम्ही सुद्धा अश्याच गरिब कुटुंबातून आलो, डॉक्टटर झालो. धारावीनंच आम्हांला वाढवलं, शिकवलं. आता तिचं ऋण फेडण्याची जबाबदारी आमची"


जी उत्तर सहाय्यक आयुक्त असणारे किरण दिघावकर म्हहतात की "आजचं दिलासादायक चित्र हे धारावीसाठी काम करणाऱ्या प्ररत्येकाच्या मेहनतीचं फळ आहे. प्रशासनाकडून केलेलं सुयोग्य नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं आमच्या हातात होतं. यात सामाजिक संस्था, स्थवयंसेवी कोविड योद्धे, खाजगी डॉक्टरांची मोफत सुविधा हे सगळं बळ प्ररशासनासोबत उभं राहिलं. आणि खुद्द धारावीकरांनीही त्याला सक्रात्ममक प्रतिसाद दिला. धारावीच्या आजच्या चित्रात पोलिसांचा वाटाही मोलाचा आहे. त्यांनी धारावीकरांना शिस्त लावली तेव्हा प्रशासनाला आपलं काम करता आलं."


दिघावकर पुढे म्हणतात की, "धारावी अशी जागाय जिथे लोकांच्या घरात स्वयंपाकघर नाही. त्यांना नुसतं किराणासामान देऊन चालणार नव्हतं. म्हणून अनेकांच्या सहकार्यातून कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले. प्रशासनानं धारावीतील लोकांच्या गरजा समजून त्या पद्धतीने मदतीचं नियोजन केलं " बिएमसीच्या रस्त्यावरच्या सफाई कामगारापासून, शिस्त लावणाऱ्या पोलिसांपासून ते भर उन्हात पिपीई किट मध्ये फिरणारे डॉक्टर, नर्सेस, इथले वॉर्डबॉय या लढाईतले खरे हिरो. या सुपर हिरोंनीच मला कोरोनाशी लढवणारी योद्धा धारावी बनवलंय. म्हणूनच कदाचित येत्या काळात माझ्या 10 बाय 10 च्या खोलीतले संसार पुन्हा एकदा आनंदानं नांगायला लागतील. दिवसांला शंभरीपार रुग्ण ते दिवसाला फक्त 1 रुग्ण हा प्रवास सोपा नव्हताच. मला अंगाखांद्यावर वाढवलेल्या मुंबईतही आता कोरोनाची गती कमी झालीय. आता कोरोनाला हरवून पुन्हा एकदा माझ्यासकट माझी माय मुंबई पूर्वीसारखीच धावू दे.


Good News | धारावीसाठी सुखद धक्का! काल दिवसभरात एकच कोरोनाबाधित आढळला